भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक ते एक एकासी कळेना । उगेचि कल्पना घेतीं वेडे

ek te ek ekasi kalena | ugechi kalpana ghetin vede

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक ते एक एकासी कळेना । उगेचि कल्पना घेतीं वेडे ॥१॥ एकवांचुनी नाहीं एक सर्वां ठायीं । एकचि हृदयीं पुरें बापा ॥२॥ एकातें आवडी धरितां प्रेमें पोटीं । दुजा ठाव सृष्टीं कोठें असे ॥३॥ एका जनार्दनीं एकाची आवडी । एकपणें गोडी एक जाणें ॥४॥