भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती

ek to guru dusara ek sadguru sadgurukrupevachuni na kale dnyanavicharu parakhi nenati dnyani olakhati

रचनाकार: संत रामदास · अभंग
एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा । लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा सद्य प्रचीति नसतां विपत्ति । रामदास म्हणे कैसी होईल रे गति।