भजनी मालिका

संत विठाबाई

या संतांची भजने

लोक विचारीती हरीसी हो जाण देशपांड्या नाही आला जाण ॥१॥ ऐकोनिया हरी ऐसे म्हणतो जाण आज पंद्रा दिनी येतो समोर ।।२।।

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई नामी नसता प्रेमसंग काय भजनी रंग नाचोनीया ॥१॥ भाव नसता राग ताल स्वर जाण । संस्कार नसता प्रेत समजा पूर्ण ||२||

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे अधर्म तो धर्म जेणे नारायण वश्य होय ||१|| दुःख केले तरी न होतो जीवंत भवरोगाचे वैद्य येथे आहे।।२।।

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे देहभाव गेले चरण देखीले जेव्हा राजाराम ॥१॥ उठवीती मजसी हस्त दोनी धरुनी। स्वामीपासी न्हेती मजसी जाण ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाटचारा जाण येतो समजा ।। १॥ तैसे घाटीचारा सिटा समजा जाण नाम धान्य मुख्य समजा पूर्ण ||२||

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे शके सांगते ऐका सोळाशते ऐसी जाणावा तो ॥१॥ बहुधान्यनाम सवत्छर जाणा अवतार पूर्णब्रह्म जाणा ||२||

रचनाकार: संत विठाबाई

विठाबाई म्हणे स्मरण आले जैसे जनाबाई म्हणुनी सर्व माझे ॥ १॥ जनी असती माझे पाठी उभा राहसी जगजेती ।।१।।

रचनाकार: संत विठाबाई

संतासी भेटता अंग चोरीतो जाण वेश्या सुरा उरा ओळंगीतो ।।१।। देवाकरीता पैका देता रडे रुका। विषयालागी फुका लुटीतसे ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

सहस्रार्जुनाकरीता जाहला परशुराम निक्षत्री धरीत्रीकेली जाण ॥१॥ वलीकरीता झाला वामन अवतार। घातीला हो धूर पाताळांत ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

स्वामी तेथे आले प्रत्यक्ष हो पूर्ण हात फिरवीती सर्व बाळावरी ॥१॥ वरदहस्त जेव्हा लागला बाळासी जीवंत हो जाहला तात्काळाची ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

हीरण्यकश्यपाचे वेळी पद्मीनी नामे दाशीचे कुली ।।१।। दुसरा जन्म ऐका अता मंथरा नामे लाथ दिधली माथा।।२।।

रचनाकार: संत विठाबाई