भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठाबाई सांगत खूण विदेही गर्जा नाम जाण

vithabai sangat khun videhi garja nam jan

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
विठाबाई सांगत खूण विदेही गर्जा नाम जाण ॥१॥ कोटी कोटी नाम करीता देहाने न चुके बंधन समजा आधी ॥२॥ विदेह प्रेमाने येक नाम घेता आनंदाश्रु जाता नयनी सदा ||३|| विदेहाने नाम म्हणणारे वीरळ । भेटी होणेसी गाठी पुण्य पाहिजे ||४|| नाम म्हणता देही न भेटतो जाण म्हणता विदेही प्रत्यक्ष ते ||५|| स्वामी नाम विदेह घरी देवदेहसंबंध दूर करी ||६|| विठाबाई म्हणे नाम चिदंबर विदेह अंतर शोधोनी म्हणा॥७॥ जडदेह सोडोनी विदेहाने जाण उपचाराचे पूर्ण चिदंबर॥८॥