भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिदंबर क्षेत्री मल्हार दीक्षीत जाती तपस्यास सहीत सती

chidambar kshetri malhar dikshit jati tapasyas sahit sati

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
चिदंबर क्षेत्री मल्हार दीक्षीत जाती तपस्यास सहीत सती ।।१।। मल्हार दीक्षीत भक्तीसामर्थ्याने सगुण केले जाणा विठ्ठलासी ॥२॥ देव बोले तेव्हा हसत हो त्याना अवतारा घेतो तुमचा उदरी।।३।। विठाबाई म्हणे मागील जन्माची आठवण वसुदेव देवकीची ||४|| लौकीकाकरीता गर्म घरी लक्ष्मी नसे वेदना त्याना तीळभरी ॥५॥ अष्टवर्षात्मक प्रगटोनी राहती। साष्टांगे करीती उभयताना॥६॥ देवकीचे वेळी इच्छा तुमचे आई बाळलीला पाहावी म्हणोनीया॥७॥ म्हणुनी सांगुनी नारायण तेव्हा बाळरूप जाहले मंगळवारी ||८||