भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्वामी तेथे आले प्रत्यक्ष हो पूर्ण हात फिरवीती सर्व बाळावरी

svami tethe ale pratyaksha ho purna hat phiraviti sarva balavari

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
स्वामी तेथे आले प्रत्यक्ष हो पूर्ण हात फिरवीती सर्व बाळावरी ॥१॥ वरदहस्त जेव्हा लागला बाळासी जीवंत हो जाहला तात्काळाची ॥२॥ बाळ सजीव जाहले सुब्बराव पहातो लोळोनी मागतो क्षमा जाण ।।३।। सुशीलम्मा हो उठीली स्वामीचरणी पडली उठवीती स्वामी हस्त धरुनी ||४|| विठाबाई म्हणे आनंदे आनंद सर्वानंद नाचताती ॥५॥