भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोक विचारीती हरीसी हो जाण देशपांड्या नाही आला जाण

lok vichariti harisi ho jan deshapandya nahi ala jan

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
लोक विचारीती हरीसी हो जाण देशपांड्या नाही आला जाण ॥१॥ ऐकोनिया हरी ऐसे म्हणतो जाण आज पंद्रा दिनी येतो समोर ।।२।। देशपांडे जाणा मरण पावला जेथे त्याची यात्रा आली समोर ते॥३॥ हिकडुनिया निये भजन मंडळी तिकडूनिया प्रेत सावकाराचे ||४|| विठाबाई म्हणे म्हणतो हरि जाण देशपांडे आला पहा तेथे ॥५॥