भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । पळे पाप महा सुटे कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥१॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । मुनिलागे बहु गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनिया करीं । पाउले गोजिरीं । विटेविरी शोभलीं ॥१॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचे मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उरलें तें भक्तिसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥१॥ पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥ अतीत देखोनि होय पाठीमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥ जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम