भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती

runachya parihara jalon volagana | dyavi narayana vasalati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥१॥ जालों उतराई शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥ आजिवरी होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥२॥ तुका म्हणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥३॥