भजनी मालिका
← भजनांकडे परत

उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला

ushir kan kela | krupaluva viththala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥१॥ मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निंश्चिती ॥ध्रु.॥ कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥२॥ तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥३॥