भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ

ubhaubhi phal | angin mantrache ya bal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥१॥ म्हणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥ कळी काळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥२॥ तुका म्हणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥३॥