भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनिया करीं । पाउले गोजिरीं । विटेविरी शोभलीं

ubhe chandrabhage tirin | kat dharoniya karin | paule gojirin | viteviri shobhalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उभे चंद्रभागे तीरीं । कट धरोनिया करीं । पाउले गोजिरीं । विटेविरी शोभलीं ॥१॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचे मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥ रूप डोळिया आवडे । कीतीं श्रवणीं पवाडे । मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥२॥ तुका म्हणे नाम । ज्याचे नासी क्रोध काम । हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥३॥