भजनी मालिका
← भजनांकडे परत

उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची

ushtya patravali karuniyan gola | dakhaviti kala kavitvachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥ तुका म्हणे एक नारायण घ्याई । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥