भजनी मालिका
संत सेना

संत सेना

या संतांची भजने

धन्य महाराज पुंडलीक मुनी। वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी ॥१॥ केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ॥२॥

रचनाकार: संत सेना

नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥१॥ प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी। मार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥

रचनाकार: संत सेना

नामयाचा धरूनि हात। सांगे संवत्सराची मात। विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥१॥ ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका। सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥२॥

रचनाकार: संत सेना

नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥१॥ धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर । धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥२॥

रचनाकार: संत सेना

नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन। जातील जळोनि महापापें ॥१॥ नलगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरी भेटे ॥ २॥

रचनाकार: संत सेना

न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशी। प्रतिपाळावें धर्मासी। व्यवहारासी न सांडी॥१ ॥ ऐका स्वधर्मविचारी । धंदा करी दोन प्रहर । सांगितलें साचार । पुरणांतरीं ऐसें हें ॥ २॥

रचनाकार: संत सेना

पुण्यभूमी आळंकावती। प्रत्यक्ष नांदे कैलासपती। आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥ १॥ ऐका अळंकापुरीची मात । स्वयें वर्णीत श्रीभगवंत । उपमेसि न पुरे निश्चित । वैकुंठ आदिकरुनी ॥२॥

रचनाकार: संत सेना

पुण्यभूमी गंगातीरीं । धरी अवतार त्रिपुरारी। नाम त्रिंबक निर्धारी । मागें ब्रह्मगिरी शोभत ॥१ ॥ पार्वतीसी सांगे कैलासराणा । येथे नांदेल निवृत्ति निधान। त्याचेनि ठाव हा पुण्यपावन । जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥२॥

रचनाकार: संत सेना

पुत्राचिया ओढी बाप करी जोडी । वाळवुनि कुरवंडी आपणा करी ॥१॥ मिरासीचा धनी करुनी ठेविला। भार तो वाहिला कडिये खांदी ॥२॥

रचनाकार: संत सेना