भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंग दास । म्हणती सांभाळी ब्रीदास

pandurang das | mhanati sambhali bridas

रचनाकार: संत सेना · अभंग
पांडुरंग दास । म्हणती सांभाळी ब्रीदास ॥१॥ नाहीं भाव आंगीं। भूषण मिरवितो जगीं ॥२॥ व्रत आचरण । नाहीं केलें तुझें ध्यान ॥३॥ स्थिर नाहीं मन । सदा विषयाचें ध्यान ॥४॥ सेना आहे अपराधी। सांभाळावें कृपानिधी ॥५॥