भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमसुखें कीर्तन। आनंदें गाऊ हरीचे गुण

premasukhen kirtan| ananden gau hariche gun

रचनाकार: संत सेना · अभंग
प्रेमसुखें कीर्तन। आनंदें गाऊ हरीचे गुण ॥१॥ धरिला वैष्णवांचा संग । नाहीं लाग कळीकाळा॥२॥ स्वल्प मंत्र हाचि जाण। राम कृष्ण नारायण ॥३॥ वाचे न उच्चारी कांहीं । याविण आणिक नाहीं ॥४॥ सेना म्हणे रंगलें ठायीं । माझें चित्त तुझें पायीं ॥५॥