भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी

namayachya narayanen ghetali ali | ya bhumichen mahiman sange mhane vanamali

रचनाकार: संत सेना · अभंग
नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥१॥ धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर । धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥२॥ या भूमीचें वर्णन करूं न शके चतुरानन। महा क्षेत्र पुरातन पातकें नासती स्मरणे ॥३॥ सेना म्हणे जगज्जीवन सांगतसे जीवींची खूण । महा दोषा होय दहन ज्ञानदेव दरुशनें ॥४॥