भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

गोकुळीं चोरी करितो चक्रपाणी गवळणी येउनी सांगती गार्‍हाणीं । येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळीं ठेवितां श्रीकृष्णनाथ । वसुदेवास माया प्राप्त । तेणें पावला त्वरित । देह बंदिशाळे ॥१॥ तंव तुटली जडली बेडी । कपाटा पडली कडी । भव भयाच्या कडाडी । अहं कंस पावे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी । मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।

रचनाकार: संत एकनाथ

गोकुंळींचा कान्हा अवतरला तान्हा । प्रथम पूतना शोषियेली ॥१॥ जन्मला वोखट घालुं आला वीट । पिढें महाबळभट पिटविला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोकुळीच्या जना ध्यान । वाचे म्हणती कृष्ण कृष्ण । जेवितां बैसतां ध्यान । कृष्णमय सर्व ॥१॥ ध्यानी ध्यती कृष्णा । आणिक नाहीं दुजी तृष्णा । विसरल्या विषयध्याना । सर्व देखती कृष्ण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोधनें चाराया जातो शारंगपाणी । मार्गीं भेटली राधिका गौळणी । कृष्ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । तें सुख परिक्षिती संतजन ॥१॥ ऐसें अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥ हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळ म्हणती कान्हा । सांभाळीं आपुल्या गोधळा । पळतां सैराट धांवती राना । गेल्या ठेल्या त्या तुम्हीं जाणां ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥ ऐसा आनंड गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवंचे वारकरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवतें ॥१॥ सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहतें न बोले कांहीं ॥१॥ करिती गलबला मिळती सकळां । बोलती अबला वाईट तें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोमटीं गोजिरी पाउलें साजिरीं । कटी मिरविली करें दोन्हीं ॥१॥ वामभागी शोभे भीमकतनया । राही सत्यभामा या जीवलगा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोमटें गोजिरें पाउलें साजिरें । धरियेलीं गोजिरीं विटेवरी ॥१॥ वेध तो तयाचा मनें कायावाचा । दुजा छंद साचा नाही मना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा ॥१॥ रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणीं धाय मनास तया पाहतां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें ॥१॥ गहिनीनें निवृत्तिनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ