भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी

gopal mhanati kanhaya krushnaten | aji yamuneche jal varja kan ji

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें । आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥ हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला । म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥ ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी । गदियांची मादि सवें घेत ॥३॥ बाऊ पहावया गडे हो अवघे चला । या कृष्णबोला राहुं नका ॥४॥ एका मागें एक गडी ते निघाले । एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥