भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोमटें गोजिरें पाउलें साजिरें । धरियेलीं गोजिरीं विटेवरी

gomaten gojiren paulen sajiren | dhariyelin gojirin vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोमटें गोजिरें पाउलें साजिरें । धरियेलीं गोजिरीं विटेवरी ॥१॥ वेध तो तयाचा मनें कायावाचा । दुजा छंद साचा नाही मना ॥२॥ इंद्रिये धांवतों आकळती ठायीं । विठोबाचे पायीं ठेवियलें ॥३॥ एका जनार्दनीं वेधलेंसे मन । धरुनी चरण दृढ ठेलों ॥४॥