भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोड साखरसे गोड साखरसे । रामनाम रसे चवी आली

god sakharase god sakharase | ramanam rase chavi ali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोड साखरसे गोड साखरसे । रामनाम रसे चवी आली ॥१॥ देठीचें फळ देठीं पिके । रान तोडितां चवी चाखे ॥२॥ न फोडी न तोडी सगळेंचि सेवी । ब्रह्मादिकां तो वाकुल्या दावी ॥३॥ एका जनार्दनीं घेतली गोडी । जीव गेला तरी मी न सोडी ॥४॥