भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥ विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं ॥१॥ ध्यानीं धरुं विठ्ठल करुं तयाचें कीर्तन । आणिक चिंतन नाहीं दुजें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हीं असतां माजघरीं । रात्र झाली दोन प्रहरीं । मी असतां पतिशेजारीं । अवचित हरी तुझा आला ॥१॥ काय संगु सखये बाई । वेदशास्त्रां अगम्य पाहीं । आगमनिगमां न कळे कांहीं । मन पवन पांगुळलें गे बाई ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हीं तो वासना भाजियेली बळें । वैराग्याचोनि बळेंक आथियलें ॥१॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । भरला निर्धार हृदयामाजी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्ही ब्रह्मापुरींचे ब्राह्मण । यातिकुळ नाहीं लहान ॥१॥ आम्हां सोवळें वोवळें नाहीं । विटाळ न देखों कवणें ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्हीं मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाहीं अंगी ॥१॥ सैर धांवे मन नाहीं पैं अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वायां जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य जातें पळ पळ तुजला कैसें कळेना । दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा ॥१॥ चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना । आयुष्य खातो काळ तुम्हीं राम कां रे म्हणाना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य जातें मागुतें येतें । रामनामें सरतें होय मुख ॥१॥ देह जातें मागुतें होतें । रामनामें सरतें होय मुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा ॥१॥ आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥ आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्याच्या अंतीं । राम म्हणतां वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाहीं ॥१॥ हात पाय सिद्ध आहे । तंव तूं तीर्था जाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ