भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं मागतों फुकांचे । तुम्हां देतां काय वेंचे

amhin magaton phukanche | tumhan detan kay venche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हीं मागतों फुकांचे । तुम्हां देतां काय वेंचे ॥१॥ संतसंग देई देवा । दुजा नको कांहीं गोवा ॥२॥ पंढरीसी ठाव द्याव । हेंचि मागतसें देवा ॥३॥ एका जनार्दनीं मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥