भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी

amhin jahalon gosavi | amachi vibhut chalavavi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हीं जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी ॥१॥ भांग भुरका हें साधन । शिष्य मिळाले चहुकोन ॥२॥ हें तों सोंगाचे साधन । राजी नाहीं जनार्दन ॥३॥ एका जनार्दनीं भाव । भाव तेथें वसे देव ॥४॥