भजनी मालिका

भजने

मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारीं यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकी नुरेचि कांहीं । मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

मिळोनि धमकटी दहीं दूध ते खाती । मी खेळतां राजबिंदीं घरांत नेतीं ॥१॥ नग्न होऊनियां नाहती अबळा । डोळें झांक म्हणती मज त्यां सकळां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मिळोनि बारा सोळा घोकणी घोकिती । तो ही श्रीपती पंढरीये ॥१॥ रुप ते सांवळें सुंदर सोभलें । गळां मिरवलें तुळशीहार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी अल्प मतिहीन । काय वर्णु तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥१॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुक्त केलें राक्षसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी अवगुणी अन्यायी किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं ठाव देई विठ्ठले ॥१॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें ॥१॥ देखत देखत घेतसे विख । अंतीं तें सुख केवीं होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥ येरवीं हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥ नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी तव बैसलों धरुनियां आस । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मी तूं हें कथन सांगसी काबाड । विठ्ठल येवढें न सांगसी ॥१॥ ऐसें कांहीं सांग जेणें फिटे पांग । नित्य पांडुरंग-भजन सोपें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी तो तुझा दास न करी उदास । मायामोहपाश तोडीं देवा ॥१॥ प्राण जावो परी नको करूं त्याग । करी अंगसंग अंगिकार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मी तो दरिद्री नाहीं जवळी द्रव्य । कैसा तरणोपाय होय आतां ॥१॥ या नामयाचें कैसें होईल लग्न । कोण देईल धन आम्हांलागी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मी तों दीन नेणें रंक । परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥ केले अपराध क्षमा करा । काय म्यां दातारा विनवावें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा