भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें

mi ek shuchi jag hen apavitra | karmachi vichitra vodhavalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी एक शुची जग हें अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवलें ॥१॥ देखत देखत घेतसे विख । अंतीं तें सुख केवीं होय ॥२॥ अल्पदोष ते अवघेंची टाळी । मुखें म्हणे सर्वोत्तम बळी ॥३॥ अभिलाषें अशुची झालासे पोटीं । एका जनार्दनीं नव्हेंचि भेटी ॥४॥