भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तूं प्रवृत्तिसी आलें

mi tun pravruttisi alen

मी तूं प्रवृत्तिसी आलें । समग्र गिळिलें वासनेसी ॥१॥ नाहीं त्यासि मेरु कैसा विवेकु । जनवन लोकु ब्रह्म दिसे ॥२॥ उजडली शांति मावळली निशी । अवघा ब्रह्मरसीं पाजळलें ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं क्षमाचि उपजली । प्रवृत्ति सामावली निवृत्ति रया ॥४॥