भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें

mi cha vikhal mi cha vikhal | yer sakal bahu baren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें ॥१॥ पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥ मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥२॥ आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥३॥