भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी

mi ten mi tun ten tun | kunkud hen ladasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥१॥ वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥ येथील तेथें तेथील येथें । वेगळ्या कुंथे कोण भारें ॥२॥ याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥३॥