भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा

mi techi majhi pratima | tethen nahin an dharma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मी तेचि माझी प्रतिमा । तेथें नाहीं आन धर्मा ॥१॥ तेथें असे माझा वास । नको भेदे आणि सायास ॥२॥ कलियुगीं प्रतिमेपरतें । आसना साधन नाहीं निरुतें ॥३॥ एका जनार्दनीं शरण । दोन्हीं रूपें देव आपण ॥४॥