भजनी मालिका

भजने

आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्‍हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥१॥ म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुतें । वोसारल्या चित्तें चालविसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥१॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपाय़ीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे बैकुंठ न वांछू कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस देवा पायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥ म्हणोनि भिन्न भेद नाहीं ।देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं। एका एक वेगळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही हाटा जाऊं लवकरी येऊं । नैवेद्य पाठवूं नाम्या हातीं ॥१॥ दुसर्‍या दिवशीं नैवेद्य धाडिला । दामसेठी गेला त्याच्या मागें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

आयुष्य जातें पळ पळ तुजला कैसें कळेना । दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा ॥१॥ चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना । आयुष्य खातो काळ तुम्हीं राम कां रे म्हणाना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य जातें मागुतें येतें । रामनामें सरतें होय मुख ॥१॥ देह जातें मागुतें होतें । रामनामें सरतें होय मुख ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा ॥१॥ आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥ आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥ नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम