भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा

ayushya mojavaya baisala mapari | tun kan re vevhari sansaracha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥ नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥ कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥ राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥ तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥