भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं होतों पंढरिसी । आमची जुनाट मिरासी

amhin hoton pandharisi | amachi junat mirasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हीं होतों पंढरिसी । आमची जुनाट मिरासी ॥१॥ राई रखुमाई माता । पांडुरंग आमुचा पिता ॥२॥ पुंडलीक आमुचा भाइ । चंद्रभागा बहिणाई ॥३॥ नामा ह्मणे हो शेवटीं । घर चंद्रभागे कांठीं ॥४॥