भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली

amhin sharanagatin sandili vasana | te tvan narayana angikarili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥१॥ म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुतें । वोसारल्या चित्तें चालविसी ॥२॥ अज्ञान बाळकु ठकविला धुरू । तैसा मी अधिरू नव्हे जाण ॥३॥ लंकापति केला तुवां बिभीषण । झालासी उत्तीर्ण वाचाऋणें ॥४॥ उपमन्यें घेतला दुधाचाचि छंद । तैसा बुद्धिभेद नव्हे जाण ॥५॥ नामा म्हणे तैसा नव्हे मी अज्ञा । माग तुज देईन शरीर अवघें ॥६॥