भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें

amhi sarvakal kainchin savadhan | vyavasayen man abhyasalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥१॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥ याच कानसुली मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥२॥ तुका म्हणे निद्रा जागृति सुषुप्ति । तुम्ही हो श्रीपती साक्षी येथें ॥३॥