भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही स्वामीचिया बळें । येथें असों खेळेमेळें

amhi svamichiya balen | yethen ason khelemelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्ही स्वामीचिया बळें । येथें असों खेळेमेळें ॥१॥ नामें गाऊनी आवडी । करुं पदांच्या घडामोडी ॥२॥ करुन कीर्तन सोहळा । रंजवूं नारीनरबाळां ॥३॥ निळा म्हणे दिवसराती । केव्हां नेणों येती जाती ॥४॥