भजनी मालिका

भजने

होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥१॥ आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । आठविता सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होई शरणागत भाकी रे करुणा । तरीच बंधना चुकशील ॥१॥ आपुलें तूं हित करूनियां घेई । सदा वाचे गाई रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होईन मी दास कामारी संताचा । संकल्प हा साचा जीवभावें ॥१॥ घालीन लोटांगण करीन पुजन । भावें वोवाळीन प्राण माझा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होईंल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥१॥ तुम्हांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां ॥१॥ करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होईल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥ शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥ शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होउनी भक्तांचा अंकिला । पुरवितसे मनोरथ । ऐसी हे प्रचीत । उघड पहा ॥१॥ देव भक्ताचा अंकिला । धांवे आपण वहिला । भक्ताचिया बोला । उणें पडों नेदी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥१॥ निंदिती कदान्न इच्छिती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

होऊनि सावधान चित्ता । उपमन्यूची कथा । एका भावें ऐकतां । सायुज्यता पाविजे ॥१॥ उपमन्यु मागितलें । देवें तयासी दिधलें । तें सांगेन वहिलें । चित्त देऊनी परियेसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ