भजनी मालिका
← भजनांकडे परत

होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं

houni jangam vibhuti laviti | shankh vajaviti gharogharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥१॥ शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥ध्रु.॥ तुका म्हणे त्यासी नाहीं शिवभक्ती । व्यापार करिती संसाराचा ॥२॥