भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं

houn nako kanhin ya mana adhin | naiken vachan yachen kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥ आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥ तुका म्हणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥