भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव

hoil jala angen dev jo apan | tayasi he jan avaghe dev

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥३॥