भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे

hoil majhi santin bhakili karuna | je tya narayana manin baise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होईल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥ शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥ क्षेम आहे ऐसें होईल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥२॥ अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होईल कृपावंता निरोपिली ॥३॥ तुका म्हणे सवें येईल मुऱ्हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥४॥