भजनी मालिका

भजने

हरणी सांगे कांहीं कर्मविपाकासी । ऐशा ऐशा दोषीं ऐसे होती ॥१॥ ठकवूनियां आह्मीं तुज जाऊं जरी । अंधतमाभि-तरीं वास पावों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥१॥ काय करुं माय सांवळा श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ध्रु०॥

हरि गातां बरवा ऐकतां बरवा । ह्लदयीं ध्यातां बरवा बाइयांनो ॥१॥ केशव पैं देणें केशव पैं घेणें । केंशव करणें धंदा आम्हीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरि बोला देतां हरि बोला घेतां । हांसतं खेळतां हरि बोल ॥१॥ हरि बोला हरि बोला खातां । सर्व कार्य करितां हरि बोला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥ नको नको मान नकों अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरि म्हणा बोलतां हरि म्हणा चालतां । हरि म्हणा खेळतां बाळपणीं ॥१॥ म्हणा हरिनाम पुरती सकळ काम । हरिनामें ब्रह्मा हातां चढें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण ॥१॥ अहिल्या पाषाण अजामेळ कुळहीन । उद्धरिला दर्शनें वाल्मिक जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिःॐ तत्सदिति सूत्राचें जें सार । कृपेचा सागर पांडुरंग ॥१॥ हरिःॐ दत्त उदात्त अनुदात्त । प्रचुररहित पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हरिकथा ऐकतां अनन्य पैं गोष्टी । निधान त्यां दृष्टी अंतरलें ॥१॥ घडी घडी प्रेम अंतरूम न द्यावें । सावधान व्हावें रामनामीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हरिकथा ऐकतां संसार आठविती । तयाच्या सुकृति अवघा नाशा ॥१॥ निश्चित होऊनि ऐकतां श्रवणीं । यमाची करणी न लगे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव