भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि असे देही सर्वकाळ संपन्न

hari ase dehi sarvakal sampanna

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरि असे देही सर्वकाळ संपन्न । म्हणोनि चिंतन निरंतर ॥१॥ हरिविण नाही हरविण नाही । दिशा द्रुम पाही विंबलासे ।॥२॥॥ हरिविण देवो नाही अन्य भावो । हरि असे सर्व देहभावी ।।३।॥ सोपान सांगत हरि सर्वत्र वसे । भाग्यवंता दिसे सर्व काळ ॥४॥