भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपरुप हरी आपणची देव

aparup hari apanachi dev

रचनाकार: संत सोपान · अभंग
आपरुप हरी आपणची देव । आपणची भाव सर्व जाला ।।१।। सर्व हरी हरी ब्रह्म अभ्यंतरी । एक चराचरी आत्माराम ।।२।। सर्व काळ सम नाही तेहो विषम । आयणची राम सर्व ज्योती ।।३।। सोपान तिष्ठत रामनामी लीन । मन तेथे मौन्य एकपणे ॥४॥