भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि भोळा हरि भोळ । आह्मीं डोळां पाहिला

hari bhola hari bhol | ahmin dolan pahila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरि भोळा हरि भोळ । आह्मीं डोळां पाहिला ॥१॥ हरि श्रेष्ट हरि श्रेष्ट । आत्मां कष्ट नाहीं ते ॥२॥ हरि उदार हरि उदार । आह्मां धीर होईना ॥३॥ नामा ह्मणे हरि दाता । आह्मां दासां रक्षितो ॥४॥