भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि आला रे हरि आलारे

hari ala re hari alare

हरि आला रे हरि आलारे । संतसंगें ब्रह्मांनंदु जालारे ॥ध्रु०॥ हरि येथेंरे हरि तेथेंरे । हरिवांचूनि न दिसे रितेरे ॥१॥ हरि पाहीरे हरि ध्याईरे । हरिवांचूनि दुजें नाहीरे ॥२॥ हरि वाचेरे हरि नाचेरे । हरि पाहातां आनंदु साचेरें ॥३॥ हरि आदीरें हरि अंतीरे । हरी व्यापकु सर्वांभूतीरे ॥४॥ हरि जाणारे हरि वानारे । बापरखुमादेविवरु राणारे ॥५॥