भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि गातां बरवा ऐकतां बरवा । ह्लदयीं ध्यातां बरवा बाइयांनो

hari gatan barava aikatan barava | hladayin dhyatan barava baiyanno

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरि गातां बरवा ऐकतां बरवा । ह्लदयीं ध्यातां बरवा बाइयांनो ॥१॥ केशव पैं देणें केशव पैं घेणें । केंशव करणें धंदा आम्हीं ॥२॥ चंद्रबिंबाची कुरवंडी ओवाळूं श्रीमुखावरी । मदन हा जिव्हारीं लजिन्नला ॥३॥ नामा म्हणे निवविलें सकळ इंद्रियांतें । म्हणोन त्या केशवातें शरण जारे ॥४॥