भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका

hari bola hari bola nahin tari abola | vyartha galabala karun naka

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरि बोला हरि बोला नाहीं तरी अबोला । व्यर्थ गलबला करुं नका ॥१॥ नको नको मान नकों अभिमान । सोडी मीतूंपण तोचि सुखी ॥२॥ सुखी जेणें व्हावें जग निववावें । अज्ञानी लावावें सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळें भाव भक्तिबळें । जगाचियें मळें न दिसती ॥४॥ दिसती जनीं वनींप्रत्यक्ष लोचनीं । एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥