भजनी मालिका

भजने

सुखाचा सोहळा वाटतसे जीवा । भेटणें केशवालागीं आजी ॥१॥ पाउलां पाउलीं याचिया वाटे । पताकांचे थाट दिसताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखाची वसति झाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखाची विश्रांति सुख समाधान । मनाचें उन्मन नाम गाता ॥१॥ तेंहें नाम सोपें रामकृष्ण हरी । प्रपंच बाहेरी उच्चारितां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना ॥१॥ अवघाचि लाभ होईल तेथींचा । न बोलावे वाचा मौनावली ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलीकापाठीं उभें असे ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुखाचें सुखरूप घेउनी जा तरी । विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक ॥१॥ आशापाश याही वासना पोखी । विठ्ठलनामा शेखीं घेऊनी राहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम ॥१॥ सुखाची गवसणी घालोनियां मना । विठ्ठलीं वासना बोल्हावली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखालागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाय एक वेळ ॥१॥ तेथें अवघाची सुखरूप होसी । जन्मोंजन्मींचे श्रम विसरसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव