भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचिया गोठी आतां किती हो

sukhachiya gothi atan kiti ho

सुखाचिया गोठी आतां किती हो करणें सुखें सुख अनुभवणें ऐसें करी ॥१॥ पढियंते बाईये गुणेविण हातां नये । साचेविण सये तेथें आवडी कैची ॥२॥ कैसेनि कीजे मनासी रक्षण । भावासी बंधन केवीं घडे ॥३॥ बापरखुमादेविवरुविठ्ठलुचि पुरे । सुखीं सुख मुरें ऐसें करी वो बाईये ॥४॥